वणवा लावणाऱ्या तिघांना शिक्षा

वाई- वणवा लावल्याप्रकरणी शशिकांत सुभाष साळुंखे (रा. आनंदपूर), रामचंद्र खरात (रा. सिद्धनाथवाडी), सुषमा वसंत सावंत (रा. सोनगिरवाडी) या तिघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी प्रत्येकी 3000 रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

शशिकांत साळुंखे यांनी पाच एप्रिल रोजी फौ.स.नं. 30 मधील चांदक येथील वनविभागाच्या राखीव वनक्षेत्र हद्दीत वणवा लावला होता. तर रामचंद्र खरात यांनी 2 मे रोजी व सुषमा वसंत सावंत यांनी 2 मे सिद्धनाथवाडी फौ. क नंबर 19 पार्टमध्ये वणवा लावला होता.

वरील आरोपीवर भारतीय वनअधिनय 1927 चे 26 (1) ब (फ) अन्वये वन गुन्हे नोंद केले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी वाई महेश सुरेश सांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली सदानंद शंकरराव राजपुरे. वनपाल वाई यांनी तपास करून आरोपी विरूध्द दि. 10 जून 2006 रोजी मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाई यांचे न्यायालयात आरोपत्र दाखल केले. सदर वन गुन्हातील आरोपीना न्यायालयात हजर केले असता तिन्ही आरोपींनी या न्यायदंडाधिकारी वाई यांचेसमोर वणव्याबाबतचा गुन्हा कबुल केला.

न्यायालयाने तीनही वन गुन्ह्याविना आरोपींना प्रत्येकी 3000 रू दंड व दंड न भरलेस 7 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. ही कारवाई उपवनसंरक्षक सातारा अनिल अंजनकर, सहाय्यक वनरक्षक विजय परळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश सुरेश झांजुर्णे वनपरिक्षेत्र अधिकारी वाई सदानंद राजपुरे वनपाल वाई वैभव शिंदे वनरक्षक वाई सुरेश सुर्यवंशी वनरक्षक परखंदी यांनी सर्वांनी तपास करून गुन्हे दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)