पुणे-हातिया रेल्वेच्या फेऱ्या रद्द

पुणे – दुर्गापूजा आणि दिवाळी निमित्त पुणे-हातिया-पुणे दरम्यान विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. यानुसार 10 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव पुणे- हातिया विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

02845 पुणे-हातिया विशेष रेल्वे दि. 9 व 16 नोव्हेंबर रोजी धावणार नाही. त्याचप्रमाणे 02846 हातिया-पुणे विशेष रेल्वे दि. 7 व 14 नोव्हेंबर रोजी धावणार नाही. पुण्यावरून हातियासाठी 19 ऑक्‍टोबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत गाडी (क्र.02845) दर शुक्रवारी सुटणार आहे. तर हातिया येथून गाडी (क्र.02846 ) 17 ऑक्‍टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी सुटणार आहे. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)