#PulwamaAttack : पुलवामा हल्ला हे एकट्यादुकट्याचे काम नाही 

माजी रॉ प्रमुख विक्रम सूद यांचे प्रतिपादन

हैदराबाद – काश्‍मीरात पुलवामा येथे झालेला हल्ला हे एकट्यादुकट्याचे कृत्य नाही, एखाद्या पथकाने संघटीतपणे हे काम केले असावे असे माजी रॉ प्रमुख विक्रम सूद यांनी म्हटले आहे. सुरक्षा व्यवस्थेतील ढिलाई हेही या हल्ल्या मागचे महत्वाचे कारण असू शकते असे त्यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमाच्यावेळी ते येथे पत्रकारांशी बोलत होते. सुरक्षा यंत्रणेतील ढिलाई खेरीज अशा प्रकारचे मोठे हल्ले होऊ शकत नाहींत असे ते म्हणाले.हल्लेखोरांना सुरक्षा दलाच्या वाहनाच्या मुव्हमेंटची व्यवस्थीत माहिती मिळाली होती. त्या मागे काही संघटीत गट असू शकतात अशी आशंकाहीं त्यांनी व्यक्त केली.

या पार्श्‍वभूमीवर भारताकडून कोणती प्रतिक्रीया अपेक्षित आहे असे विचारता ते म्हणाले की ही बॉक्‍सींगची मॅच नाही. त्याने एक पंच मारला की दुसऱ्याने लगेच दुसरा पंच लगावलाच पाहिजे असे या बाबतीत होत नसते. वेळ आणि ठिकाण सुरक्षा दलेच ठरवतील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तत्पुर्वी ते एका परिसंवादात बोलताना म्हणाले की आज आपल्यापुढे पाकिस्तानपेक्षा चीनचे आव्हान फार मोठे आहे आणि चीनच्या नियंत्रणाखालील पाकिस्तान ही तर त्याहून आव्हानात्मक स्थिती आहे. त्यामुळे आपल्याला आता त्यादृष्टीने सिद्धता ठेवायला पाहिजे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माजी गृह सचिव के पदमनाभैय्या यांचेही यावेळी भाषण झाले. काश्‍मीरच्या स्थिती विषयी बोलताना ते म्हणाले की काश्‍मीरच्या बाबत आपण राष्ट्रीय धोरण निश्‍चीत केले पाहिजे. हे धोरण केवळ कॉंग्रेस, भाजप किंवा डाव्यांच्या विचारसरणीवर अवलंबून असता कामा नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)