राजस्थानातील मंत्र्यांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध

जयपुर- राजस्थानच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री ममता भुपेश यांनी रविवारी अल्वार येथील सत्कार सोहोळ्यात बोलताना आपण मंत्री म्हणून काम करताना आपल्या जातीचा पहिल्यांदा विचार करणार आहोत असे विधान केले होते त्याचा भाजपने निषेध केला आहे. यातून कॉंग्रेस सरकारच्या संकुचित मानसिकतेचेच प्रदर्शन झाले आहे असे भाजपने म्हटले आहे. संबंधीत मंत्र्यांनी या सभेत असे म्हटले होते की जेव्हा माझी आवश्‍यकता असेल तेव्हा मी पाठ दाखवणार नाही.

मी प्रथम आपल्या जातीसाठी नंतर आपल्या समाजासाठी आणि नंतर समाजातील सर्वांसाठी काम करीन असे त्यांनी म्हटले होते. याचा अर्थ मंत्र्यांनी आपल्या जातीलाच अग्रक्रम देण्याची भूमिका मांडली असून ती अन्य समाजासाठी अन्याय करणारी आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. सरकारला जातीचा आधार घेऊन काम करता येणार नाही असे प्रदेश भाजप अध्यक्ष मदनलाल सैनी यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)