सिनेमा अडचणींच्या घेऱ्यात
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा सिनेमा अडचणींच्या घेऱ्यात सापडला आहे. या सिनेमाला निवडणूक आयोगाने दिलेल्या स्थगितीनंतर आता, चित्रपट निर्मात्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून या याचिकेवर १५ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
याआधी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक होईपर्यंत हा सिनेमा प्रदर्शित न करण्याचं सांगितलं होत. कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्याच्या जीवनावरील सिनेमा निवडणुकीदरम्यान प्रदर्शित करता येत नाही.
या सिनेमाला विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात येत असून लोकसभा निवडणूकीदरम्यान हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास लोकसभा निवडणूकीत भाजपाला फायदा होऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे.