सोलापूर लोकसभेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात 

पहिल्या दिवशी 21 जणांचे 37 उमेदवारी अर्ज नेले – जिल्हाधिकारी

सोलापूर – सोलापूर लोकसभेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 21 जणांनी 37 उमेदवारी अर्ज नेले. सोलापुरात कॉंग्रेस पक्षाकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी निश्‍चित झाली असून भाजप अद्यापसुद्धा उमेदवार निश्‍चित झालेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

सुशीलकुमार शिंदे आजपासून सोलापुरात दीर्घकाळ मुक्कामासाठी आहेत. भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असले तरीसुद्धा अद्याप उमेदवारीची घोषणा झालेली नाही. कोणत्याही क्षणी नावात बदल होईल असे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्यासह अन्य इच्छुकांना वाटत आहे. सोलापूर लोकसभेसाठी हिंदुस्थान जनता पार्टीकडून दीपक कटकधोंड महास्वामींचा एकमेव अर्ज दाखल केला. पण स्वतंत्र बॅंक खाते नसल्याबद्धल महास्वामींना पहिल्या दिवशीच नोटीस देण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णयाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)