सौदीच्या एका राजपुत्राला युवराजाकडून तुरुंगवासाची शिक्षा

रियाध: सौदी अरेबियाचे राजपुत्र मुहम्मद बिन सलमान यांनी एका राजपुत्राला तुरुंगात टाकले आहे. या राजकुमाराने युवराज खालिद यांच्याकडून कोणतेही पद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याला कैदेत टाकण्यात आले आहे. खालिद बिन तलाल असे या राजकुमाराचे नाव आहे. त्यांना यापूर्वीही अटक करण्यात आली होती. त्यांचे वडील तलाल बिन अब्दुल अजीज यांचे नुकतेच निधन झाले. त्यावेळी त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांना तत्काळ पुन्हा अटक करण्यात आली.

मुहम्मद बिन सलमान यांनी गेल्या वर्षी रिट्‌ज कार्लटन या हॉटेलमध्ये अनेक राजकुमार आणि उद्योगपतींना अटक केली होती. या अटक केलेल्यांमध्ये त्यांच्या भावाचाही समावेश होता. त्यावेळी ख़ालिद बिन तलाल यांनी त्यावर आक्षेप घेतला होता आणि हे कृत्य बेकायदा असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी मुहम्मद बिन सलमान यांच्याकडून कोणतेही पद घेण्यास नकार दिला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)