विज्ञान भवनातील भाषण पंतप्रधानांनी घेतले आटोपते

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी आपल्या पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार विज्ञान भवनातील नॅशनल युथ फेस्टीव्हलच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचे भाषण चालू असतानाच त्यांना एक महत्वाचा निरोप चिठ्ठीद्वारे त्यांना देण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपले तेथील भाषण आटोपते घेऊन महत्वाच्या बैठकीसाठी त्यांना तेथून तातडीने बाहेर पडावे लागले.

उपस्थितांना हात हलवत अभिवादन करून ते आपल्या कार्यालयाकडे रवाना झाले. त्यांच्या कार्यक्रमाच्यावेळीच बहुधा पाकिस्तानी विमानाने भारतीय हवाई हद्दीचा भंग केल्याची बातमी त्यांना कळवण्यात आली असावी म्हणूनच त्यांनी लगबगीने हा कार्यक्रम आटोपता घेतला. पंतंप्रधानांनी एका उच्चस्तरीय बैठकीत सीमेवरील घडामोडींचा आढावा घेतला. दिल्लीत वरीष्ठ पातळीवर बैठकांचे दिवसभर सत्र सुरू होते. या बैठकांना पंतप्रधान उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)