रिअलमी व शाओमीची दरवाढ 

गेल्या आठ महिन्यांत रुपयाचे मूल्य 15 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. त्यामुळे आम्हाला आयात महागात पडत आहे. तरीही रिअलमी कंपनीने आपल्या काही उत्पादनांच्या किमतीत किमान वाढ केली आहे. उत्पादनांच्या दर्जावर परिणाम होऊ दिलेला नाही. 
-माधव सेठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, रिअलमी इंडिया 

पुणे  –रुपयाचे मूल्य या वर्षात आतापर्यंत 15 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. त्यामुळे ज्या कंपन्या पूर्ण उपकरणांची किंवा सुट्या भागाची आयात करताना त्याना आयात महागात पडत आहे. त्यामुळे अशा वस्तूंची दरवाढ आता अटळ होऊ लागली आहे. मोबाइल कंपन्यांनी यावर केव्हाच आकडेमोड सुरू केली होती. रिअलमी आणि शाओमी या मध्यम किमतीचे स्मार्ट फोन विकणाऱ्या कंपन्यांनी तर दरवाढ करून टाकली आहे. इतर कंपन्यांनी काही दिवसांत दरवाढ जाहीर करणार आहेत. ही दरवाढ 8 टक्‍क्‍यांनी असेल, असे समजले जात आहे.

रिअलमी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी सांगितले की, रुपयाचे मूल्य कमी होत असल्यामुळे बऱ्याच काळापासून आम्हाला आयात महागात पडत आहे. मात्र तरीही आम्ही परिस्थिती सुधारेल या शक्‍यतेमुळे आतापर्यंत दरवाढ केली नव्हती. मात्र, आता पाणी डोक्‍यावरून चालले असल्यामुळे आम्हाला काही प्रमाणात दरवाढ करावी लागली आहे. मात्र तरीही आमचे फोन इतर फोनच्या तुलनेत माफक दरातच उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला.

-Ads-

शाओमी कंपनीनेही हेच कारण देऊन दरवाढ जाहीर केली आहे. मात्र, तरीही दरवाढ कमीत कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे कंपनीने सांगितले आहे. रुपयाच्या मूल्यात खरोखरच मोठी सुधारणा झाली तर हा प्रसंग टळू शकणार असल्याचे कंपनीने सूचित केले आहे. या दोन कंपन्यांनी दरवाढ जाहीर केल्यानंतर आता सॅमसंग, ओप्पो आणि व्हीओ या कंपन्यांही दरवाढ करण्याची शक्‍यता गृहीत धरली जाऊ लागली आहे.

दिवाळीत मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्या काळात या कंपन्यांनी दरवाढ केली नव्हती. मात्र, आता दरवाढ करावीच लागणार असल्याचे कंपनीचे अधिकारी सांगतात. जे फोन अगोदर तयार केले होते किंवा आयात केले गेले होते. ते आता दिवाळीत विकले गेले आहेत. त्यामुळे नवे फोन नव्या किमतीवर द्यावे लागणार असल्याचे कंपन्यांचे अधिकारी सांगत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)