सहगलांचे निमंत्रण रद्द करण्यासाठी प्रतिनिधींचा दबाव : साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा आरोप

यवतमाळ: मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचे नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण मागे घ्यावे, यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रतिनिधींनी दबाव आणला होता. संमेलनाच्या आर्थिक नाडया आवळण्याची धमकीही दिली होती, असा खळबळजनक आरोप मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी केला.

महामंडळाचे “बोलके’ अध्यक्ष प्रखर टीका सहन करूनही गप्प कसे, असा प्रश्न साहित्यविश्वात विचारला जात असताना अखेर ते बोलले आहेत. स्थानिक माध्यमांना थकव्याचे कारण सांगून प्रतिक्रिया नाकारणाऱ्या जोशींनी शनिवारी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन मन रिते केले. पण असे रिते होताना त्यांनी बॉम्बगोळा टाकला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सहगल यांचे निमंत्रण संमेलनाच्या आयोजकांनी रद्द केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. अनेक मान्यवर निमंत्रितांनी संमेलनावर बहिष्कार टाकला. या घटनेची जबाबदारी आपण स्वीकारतो, असे सांगून श्रीपाद जोशी यांनी राजीनामा दिला होता. पण या प्रकरणाला राजकीय रंग असल्याची चर्चा सुरू होती.

कुणी तरी आयोजकांना धमकी देऊन त्यांना नको असलेल्या व्यक्तीला नाकारतो. त्यांना निमंत्रण रद्द करण्यास भाग पाडतो. यात कुटिल कारस्थान रचून याचा मागमूसही इतरांना लागू देत नाही. या घटनेचे खापर महामंडळाच्या अध्यक्षांवर फोडले जाते, ही मराठी भाषिकांसाठी अत्यंत लाजिरवाणी घटना आहे, असेही जोशी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)