दिल्लीतील अनेक दिग्ज नेत्यांचे भविष्य एव्हीएम मशीन मध्ये होणार बंद..
नवी दिल्ली- देशाचे राष्ट्रपती ‘रामनाथ कोविंद’ यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. राष्ट्रपती भवन येथे तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर राष्ट्रपती ‘रामनाथ कोविंद’ यांनी मतदान केले. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून जोरदार सुरवात झाली आहे. आज देशातील अनेक दिग्ज नेत्यांचे भविष्य एव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे. दिल्लीतील लोकसभेच्या सर्व 7 जागा निवडून देण्यासाठी मतदार राजा त्यांचा हक्क बजावणार आहे.
Delhi: President Ramnath Kovind casts his vote at a polling booth in Rashtrapati Bhawan #LokSabhaElections2019 pic.twitter.com/O14Q2yZQzt
— ANI (@ANI) May 12, 2019
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यामध्ये सात राज्यांमधील 59 जागांवर आज मतदान होत आहे. सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणामधील सर्व 10 जागांशिवाय उत्तरप्रदेशातील 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8-8 तर झारखंडमधील 4 जागांवर मतदान होत आहे.