मंगळावर ज्वालामुखीच्या अस्तित्वामुळे पाण्याची शक्‍यता 

वॉशिंग्टन – पृथ्वीचा शेजारी असलेल्या मंगळ ग्रहाविषयी मानवाला नेहमीच उत्सुकता राहिलेली आहे. त्यातूनच या ग्रहावरील ज्वालामुखीमधील हालचालींमुळे या ग्रहावर पाण्याचे अस्तित्व असण्याची शक्‍यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या ग्रहावर एकेकाळी वाहते पाणी होते, हे सिद्ध होत आहे. मात्र, आता मंगळग्रहाच्या भूमीवर पाण्याचे अस्तित्व आहे का व पर्यायाने तिथे सूक्ष्म जीवांच्या स्वरूपात का होईना जीवसृष्टी आहे का, याचा सातत्याने शोध घेतला जात आहे. आता संशोधकांनीही त्यावर आपला शिक्‍कामोर्तब केला असून, मंगळावरील ज्वालामुखीय हालचालींमुळे तिथे पाण्याचे अस्तित्व असू शकते, असे वक्तव्य करत मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचे अस्तित्व असावे, असे म्हटले गेले. मंगळाच्या बर्फाच्छादीत अशा दक्षिण ध्रुवावर जमिनीखाली द्रवरूपातील पाणी असू शकते. अर्थात त्यासाठी उष्णतेचा स्रोत गरजेचा आहे व तो ज्वालामुखी असू शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

याबाबतचे संशोधन अमेरिकेतील ऍरिझोना विद्यापीठातील संशोधकांनी केले आहे. गेल्या हजारो वर्षांच्या काळात मंगळावर मॅग्मा चेंबर (ज्वालामुखीचा थर) तयार झालेले आहे. अलीकडच्या काळात निश्‍चितपणे मॅग्माच्या हालचाली झालेल्या असाव्यात, असे संशोधकांना वाटते. यामुळे इतकी उष्णता निर्माण झाली की, पृष्ठभागाखाली दीड किलोमीटर जाडीचा बर्फ वितळून त्याचे पाणी झाले असावे, असेही त्यांना वाटते. जर पृष्ठभागाखाली अशा प्रकारची कोणतीही मॅग्मा हालचाल झालेली नसल्यास ध्रुवीय क्षेत्राखाली पाण्याचे अस्तित्वही शक्‍य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Ads

1 COMMENT

  1. वरील बातमीपत्र वाचण्यात आले अमेरिकेतील व जगभरातील समस्त संशोधकांनी मंगळावर पाणी शोधण्याचा हा बालिश खेळ थांबवावा कारण भारतीय संशोधक श्री ज्ञानेश्वरांनी त्यातही जीवन नाही म्हणजे पाणी नाही हे अगोदरच सांगितले आहे पण हि शहाणी माणसे ह्या शोधासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करीत आहेत हे सत्य आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)