तहव्वुर राणा भारताच्या ताब्यात येण्याची शक्‍यता

वॉशिंग्टन: मुळ पाकिस्तानी वंशाचा कॅनडीयन दहशतवादी तहव्वुर राणा याला अमेरिकेत झालेली चौदा वर्षांची शिक्षा 2021 साली संपणार असून त्याची ही शिक्षा संपल्यानंतर त्याला मुंबई हल्ला प्रकरणात भारताच्या हवाली केले जाण्याची शक्‍यता आहे अशी माहिती आज संबंधीत सूत्रांनी दिली.

राणाला सन 2009 मध्ये शिकागो मध्ये अटक करण्यात आली होती. तो 26/11 च्या मुंबई हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी आहे. त्यावरून त्याच्यावर अमेरिकेत खटला चालवण्यात आला त्याला तेथे चौदा वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. त्याची मुदत 2021 साली संपत आहे. डिसेंबर 2021 मध्ये तो कारागृहातून सुटणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर त्याला भारताच्या ताब्यात देण्यासाठीची कागदपत्री प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. तथापी त्याला पुन्हा मुंबई हल्ला प्रकरणात ताब्यात घेतले जाणार नाही कारण त्यांनी त्या प्रकरणात अमेरिकेत आधीच शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याला पुन्हा त्याच कारणावरून भारताच्या ताब्यात देणे अमेरिकेलाही कायदेशीर दृष्ट्या अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे त्याला दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि छबाड हाऊस वरील हल्ल्याच्या गुन्ह्यात ताब्यात देण्यात यावे अशी भारतीय अधिकाऱ्यांची मागणी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)