रॉबर्ट वढेरा यांना अटक होण्याची शक्यता

दिल्ली – रॉबर्ट वढेरा यांच्या पुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेव्हणे आणि उत्तरप्रदेशच्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना अटक होण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीच्या पतियाला हाऊस कोर्टात बाजू मांडताना रॉबर्ट वढेरा हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे चौकशीसाठी रॉबर्ट वढेरा यांना ताब्यात घेण्याची मागणी सक्तवसुली संचालनालयातर्फे कोर्टात करण्यात आली आहे.

यापूर्वी न्यायालयाने रॉबर्ट वढेरा यांनी चौकशीला सहकार्य करावे असे सांगत, २५ मार्च पर्यंत अंतरिम जामिनाचा कालावधी वाढवण्यात आला होता. रॉबर्ट वढेरा यांनी लंडन मध्ये काही मालमत्ता खरेदी केल्या आहेत पण त्याची माहिती त्यांनी त्यांच्या मालमत्तेच्या यादीत दिलेली नाही. हा मनि लॉंड्रिंगचा प्रकार आहे असा आरोप ईडीने न्यायालयात केला आहे. लंडनच्या ब्रॅनस्टोन स्क्वेअर परिसरात वढेरा यांची सदनिका असून त्याची किंमत 1.9 दशलक्ष पौंड इतकी आहे असा दावा ईडीकडून करण्यात येत आहे. वढेरा यांच्याशी संबंधीत असलेल्या स्कायलाईट हॉस्पीटॅलिटी एलएलपी या कंपनीशी संबंधीत असलेल्या मनोज अरोरा नावाच्या एका कर्मचाऱ्याचीही ईडीने चौकशी केली असून याच संबंधात ईडीने त्या कंपनीवर गेल्या डिसेंबर महिन्यात छापाही घातला होता.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)