आगामी काळात दुधाच्या दरात वाढ होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – स्किम्ड मिल्कच्या उत्पादनात आलेली घट आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मागणीमुळे दुधाचे दर पुन्हा एकदा भडकणार आहेत. दुधाचे हे वाढणारे दर येत्या तिमाहीमध्ये लागू होण्याची शक्‍यता आहे.

दुधाचे दर वाढल्यानंतर इतर डेअर उत्पादने जसे की, लोणी, तूप, दही आणि फ्लेवर्ड मिल्क महागणार आहेत; परंतु अमूल आणि मदर डेअरीने अद्यापही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. दूध, आइसक्रीम यांसारख्या इतर दुधाच्या उत्पादनांची किंमत वाढणार असून, उत्पादनांच्या कमतरतेमुळे दुधाच्या दरात 1 ते 2 रुपयांची प्रतिलिटर वाढ होण्याची प्रस्तावित आहे. तसेच 2019-20 मध्ये दुधाचे उत्पादन 3 ते 4 टक्‍क्‍यांनी घटण्याची शक्‍यताही वर्तवण्यात येत आहे. दुधाचा तुटवडा हा 6 ते 7 टक्‍क्‍यांनी वाढणार असून, त्यामुळेच दुधाची कमतरता जाणवणार आहे.

2017 मध्येही दुधाच्या दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ झाली होती. जगभरात स्किम्ड मिल्कचा दर 20 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. मार्च 2018 च्या शेवटी स्किम्ड मिल्कचा 3 लाख टन साठा होता. हा25 टक्‍क्‍यांनी घटण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)