गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांत रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण आढावा बैठकीत रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटसमध्ये कपात केल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील काही बॅंकांनी गृहकर्जावरील व्याजदरात घट केली आहे. असे असताना आणखी काही बॅंकांनी अद्याप व्याजदरात कपात केली नसून त्यांनीही आपल्या कर्जाच्या व्याजदरात कपात करावी अशी सूचना रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे.

रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश बॅंका व्याजदर कमी करण्यास तयार झाले आहेत. बॅंका आपल्या व्याजदरात पाच ते दहा बेसिक पॉइंटमध्ये कपात करणार आहेत. बॅंकांच्या व्याजदरात कपात करून अर्थव्यवस्थेला गती द्यावी, असे आरबीआयने म्हटले आहे. यानुसार बॅंक मार्जिन सांभाळत आणि नफ्याला धक्का न लावता ग्राहकांना लाभ देण्यास राजी झाल्या आहेत. रेपोरेटच्या कपातीचा फायदा ग्राहकांना मिळावा अशी अपेक्षा रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केली होती. यासाठी बॅंकांना मार्जिनल कॉस्ट आणि लॅंडिंग रेटमध्ये कपात करावी लागणार आहे. यानुसार बहुतांश बॅंका 31 मार्चपर्यंत व्याजदरकपातीची प्रक्रिया पूर्ण करतील अशी आशा आहे.

माहितीनुसार खासगी बॅंका पाच ते दहा बेसिस पॉइंटमध्ये कपात करतील तर सार्वजनिक क्षेत्रातील किमान चार बॅंका आणि एक खासगी बॅंक याच आठवड्यात व्याजदर कपातीची घोषणा करू शकतात. गृहकर्जाचा व्याजदर हा एमसीएलआर, बेस रेट आणि बॅंकांकडे असणाऱ्या गंगाजळीच्या आधारावर ठरविला जातो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)