सातारा मतदारसंघात नूरा लढतीची शक्यता

-2014 ची पुनरावृत्ती होणार : पक्ष प्रमुखांच्या भूमिकेकडे लक्ष
-सम्राट गायकवाड


सातारा –
राज्यात एका बाजूला भाजप-सेनेकडून कॉंग्रेस-राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न होत असताना साताऱ्यात मात्र 2014 च्या निवडणुकीचा पॅटर्न रिपीट होण्याची शक्‍यता आहे. विद्यमान खा.उदयनराजे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देण्याची भाजप व सेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा असताना पदाधिकाऱ्यांकडून मात्र नुरा लढतीच्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसून येत आहेत.

विशेषत: मागील पाच वर्षात संघटन बांधणीच्या बाबतीत भाजप आघाडीवर असताना साताऱ्याच्या जागेवर सेनेने दावा सांगितला आहे. एवढेच नव्हे तर उमेदवारीसाठी सक्षम नव्हे तर निष्ठावंत निकष परस्पर ठरविण्यात आला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख साताऱ्याच्या बाबतीत काय निर्णय घेणार, याकडे युतीच्या कार्यकर्त्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

बानुगडे-पाटील एकदा लढाच

शिवसेना नेते नितीन बानुगडे-पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. मात्र, महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरावे लागणार असल्याचे कारण देत त्यांनी साताऱ्यातून लढण्यास नकार दिला आहे. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघाच्या समन्वयकपदी सेनेकडून बानुगडे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, बानुगडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली यापुर्वी सातारा व सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपयश आले आहे. परंतु तरी देखील त्यांची समन्वयकपदी नियुक्ती करून पक्षप्रमुखांनी विश्‍वास दाखविला आहे. विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठी बानुगडे-पाटील यांनीच आता साताऱ्याच्या रणांगणात उतरायला हवे, अशी देखील मागणी होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)