नगरचे राजकारण पेटले ! भाजपने आपला निर्णय तातडीने बदलावा, अन्यथा…

सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे रक्त सळसळायला लागले

कार्यकर्त्यांची भावना ; झोप उडविणारा भाजपाचा निर्णय पक्षाने बदलावा

नगर: भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून सुजय विखे यांना तिकिट देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. पक्षाच्या या निर्णयाचा निषेध कालपासून सर्वस्तरातून होवू लागला आहे. भारतीय जनता पार्टीमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी याबाबत आज सकाळी बैठक घेतली. निष्ठावान दिलीप गांधींवर अन्याय करणारा पक्षाने हा निर्णय घेतला असून, भाजपने आपला निर्णय तातडीने बदलावा. भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे रक्त सळसळायला लागले आहे. कार्यकर्त्यांचा बी.पी. वाढविणारा व झोप उडविणारा असल्याच्या भावना व्यक्त करण्याबरोबरच दिलीप गांधी यांनी आता शांत बसू नये, तातडीने योग्य निर्णय घेण्याचा विचार अनेक कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला.

सुजय विखे यांच्या संभाव्य उमेदवारीस विरोध करतांना भाजपाचे बाळासाहेब कोळगे म्हणाले, खा. दिलीप गांधी यांनी भारतीय जनता पार्टीस संपूर्ण जिल्ह्यात वाढविले. वाड्या-वस्त्यांवर गावा-गावात पक्षाचे कामाबरोबरच खासदार निधीतून मोठी विकास कामे केली आहे. अशा विकासाचा दृष्टीकोन असलेल्या दिलीप गांधी यांच्याबाबत अन्याय झाला आहे.
ज्येष्ठ कार्यकर्ते आश्रु टकले म्हणाले, 2004 साली अशाच पद्धतीने खा.दिलीप गांधी यांचे तिकिट पक्षाने कापले होते. त्यावेळेस आपण सर्वजण शांत राहिलो, आता मात्र शांत बसण्याची वेळ नाही. खा.दिलीप गांधी यांनी आता थांबू नये, योग्य निर्णय घ्यावा.

यावेळी युवा मोर्चाचे उमेश साठे,विक्रम बारवकर,अजय बोरा,मिलिंद भालसिंग,बाळासाहेब पोटधन आदींची भाषणे झाली.कासम शेख, आदिनाथ मासाळकर, अप्पासाहेब सुकासे, कमलेश गांधी, संतोष पुरोहित, निखिल मंडलेचा, कुंतीलाल चोरडिया, अनिल संचेती, हेमंत सिद्धंश्‍वर, योगेश फुलारी, कैलास गर्जे, शाकीर सय्यद, देवराव वाकडे, बापूसाहेब ढवळे, अतुल जगताप, अनिल परदेशी, अशोक खिळे, अक्षय गांधी, आनंद बोथरा, अनंत रासने, किशोर कटोरे, शिवाजी दहिंडे, गणेश साठे, वसंत राठोड, सुमित देवतरसे,मल्हारी दराडे, श्रीगोपाल जोशी, सचिन गायकवाड, सोन्याबापू वाणी, नितीन जोशी, अभिषेक शिंदे, अमोल निस्ताने, गौरव गुगळे, महेश हेडा, सुबोध रसाळ, संतोष घोरपडे, ज्ञानेश्‍वर जंगम, दिपक कार्ले, नवनाथ जिवडे, योगेश मथूर, जालिंदर शिंदे, हरिभाऊ वायकर, अभिजित चिप्पा आदि नगर शहर व दक्षिणेतील सर्व तालुक्‍यातील कार्यकर्ते उपस्थित होते.


प्रसंगी युवा मोर्चाचे 40 पदाधिकारी देणार राजीनामा 

खा.दिलीप गांधी यांनी भारतीय जनता पार्टीचे उभे केलेले काम व मतदार संघात केलेला विकास पाहुन कम्युनिस्ट पक्षाचा असतांनाही मी भाजपाचे काम करु लागलो. मात्र निष्ठावान कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने अन्याय केला आहे. त्यामुळे भाजपाने पुन्हा विचार करावा व खासदार दिलीप गांधी यांनाच उमेदवारी द्यावी,अशी प्रतिक्रिया एका कम्युनिस्ट कार्यकर्त्याने दिली.  दुसऱ्याने उत्तरेतील उपऱ्यांची आपण निष्ठावानांनी पालखी कशायला उचलायची. पक्षाने घेतलेला निर्णय निषेधार्थ आहे. प्रसंगी युवा मोर्चाचे 40 पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, असे सांगितले.


निष्ठावानांवर अन्याय 

राजकीय वलय नसलेल्यांसाठी निष्ठावानांवर पक्षाने अन्याय केला आहे. पक्षाने अन्याय केल्यामुळे खा.दिलीप गांधी यांनी पक्ष सोडला तर जिल्ह्यातून पक्ष शून्यावर येईल, एवढी ताकत त्यांची आहे. भारतात एकमेव जैन समाजाचे असलेल्या खासदारांवर असा अन्याय होत असेल तर भाजपाला संपूर्ण भारतात याची किंमत मोजावी लागेल. राजकीय लाभासाठी सुजय विखे भाजपात आले आहे. त्यांची बांधिलकी फक्त सत्ता व पैशाशी आहे. त्यामुळे त्यांचा पराभव ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. लाखो कार्यकर्त्यांची पाठबळ असलेल्या दिलीप गांधीं विखेंचा पराभव करु शकतात.असे अजय बोरा यांनी नोंदविली आहे.


 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)