राजकीय पक्षांना देणग्यांवरील व्याजात मिळाले 115 कोटी

गरिबी आणि गरीब यांचे उठताबसता नाव घेणाऱ्या राजकीय पक्षांना लोकांकडून मिळालेल्या देणग्यांवर 2017-18 या काळात जवळपास 115 कोटी रुपये व्याज मिळाले आहे. 11 राजकीय पक्षांच्या ऑडिट रिपोर्टमधून ही गोष्ट समोर आली आहे.

यामध्ये सर्वांत धक्‍कादायक बाब आहे मायावतींच्या बहुजन समाजवादी पक्षाची. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एकाही जागेवर आपला उमेदवार विजयी करून आणण्यात अपयश आलेला हा पक्ष देणग्यांवरील व्याजात अव्वल आहे. त्यांना 32 कोटी रुपयांची कमाई व्याजातून झाली आहे. अर्थात गतवर्षीपेक्षा ही कमाई 1.63 कोटींनी कमी आहे.

2016-17 मध्ये बसपाला या व्याजापोटी 33.69 कोटी रुपये मिळाले होते. भारतीय जनता पक्ष याबाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. भाजपाला 31 कोटी रुपये व्याजापोटी मिळाले आहेत.  गतवर्षीच्या तुलनेत ही रक्‍कम 2.31 लाखांनी कमी आहे. विश्‍लेषकांनी राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे जमा केलेल्या ऑडिट रिपोर्टच्या अभ्यासातून ही माहिती मिळवली आहे. या रिपोर्टमध्ये काही पक्षांनी मुदत ठेवींवरील व्याज आणि बचत खात्यावरील व्याजाची माहिती वेगवेगळी दिली आहे; तर काहींनी केवळ व्याजाचीच माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)