पोलीस उपनिरीक्षकांच्या परीक्षेतील गुणवत्ता यादीतील अतिरिक्त उमेदवारांना सामावणार 

मुंबई – पोलीस उपनिरीक्षक विभागीय परीक्षा-2016मधील मूळ मागणी पत्राव्यतिरिक्त गुणवत्ता यादीतील अतिरिक्त उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर सामावून घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
शासनाकडून 2016मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित परीक्षेच्या माध्यमातून यापूर्वी 982 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील आणखी 636 उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे कोट्यातील वेळोवेळी रिक्त होणा-या पदांवर टप्प्याटप्प्याने सामावून घेण्यात येणार आहे. हा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांच्या निदर्शनास आणून त्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)