वाल्याच्या टोळ्या घेताय तर वाल्मिकि सापडणार कुठे? : अनिल गोटे

धुळ्याच्या जाहिर सभेत गोटेंच्या हत्येचा कट

मुंबई: धुळ्यातील एका कार्यक्रमावरून राजीनाम्याची धमकी देणारे भाजप आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा पक्षाचे वाभाडे काढले आहेत. पक्षाची ताकद वाढण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या वाल्यांना पक्षात घेऊन वाल्याचा वाल्मिकी केला जात आहे. जर वाल्याच्या टोळ्याच्या टोळ्या घेताय, तर वाल्मिकी सापडणार कुठून, असा परखड सवाल करीत धुळ्यातील एका जाहिर सभेत माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा आरोप करत गोटे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला.

वेलमध्ये ठिय्या
अनिल गोटे यांना औचित्याचा मुद्दा उपस्थित करायचा होता. मात्र त्यांना परवानगी देण्यात न आल्याने त्यांनी वेलमध्ये येऊन अध्यक्षांकडे मागणी केली. मात्र त्यानंतरही परवानगी न दिल्याने त्यांनी वेलमध्येच ठिय्या दिला. तरीही सभागृहाचे कामकाज सुरूच होते. गोटे वेलमध्ये बसल्याचे पाहून संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट यांनी मनधरणी केल्यानंतर गोटे पुन्हा आपल्या जागेवर बसले. दरम्यान, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले.

-Ads-

धुळ्यातील जाहीर सभेत झालेल्या प्रकारानंतर अनिल गोटे यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मनधरणीनंतर त्यांनी माघार घेतली. मात्र, आज अधिवेशनात त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत पक्षावर तुफान हल्ला चढवला. धुळे शहाराचे गुन्हेगारीकरण वाढत चालललेय.

आपल्यावरील हल्ल्याची ध्वनिचित्रफित देणारा भाजपच्या नगरसेविका प्रतिभा चौधरी यांचा मुलगा अमोल चौधरी याला धमकावले जात आहे. ही धमकी माझ्यावर रिव्हॉल्व्हर रोखणाऱ्या माणसाकडूनच दिली जाते, असा आरोप गोटे यांनी केला. गेली 30 वर्षे मी गुन्हेगारी विरोधात लढतोय. पण पहिलयांदाच असा गंभीर प्रसंग माझयावर आला. त्या डॉक्‍टरने जर तो कट्टा काढून घेतला नसता तर आज हे सांगायला मी इथे नसतो, असे हताशपणे गोटे म्हणाले. माझं दुर्दैव की माझं सरकार आहे आणि माझ्यावर असा प्रसंग येतोय, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)