२६/११ हल्ल्याचे नियोजन करणारे आजही पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत

मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहश तवादी हल्ल्याला आज १० वर्ष उलटली. २६/११/२००८ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानमध्ये पूर्वनियोजित केला गेल्याचे अनेक प्रबळ पुरावे उपलब्ध असताना देखील पाकिस्तानने या हल्ल्यासाठी दोषी असणाऱ्या दहशतवाद्यांवर कोणतीच कारवाई केलेली नाही. दरम्यान भारतीय परराष्ट्र विभागाने आज एका अधिकृत वक्तव्याद्वारे पाकिस्तानच्या वर्तुणुकीवर खडे बोल सुनावले आहेत.

“२६/११ दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करणारे दहशतवादी आजही पाकिस्तानच्या रस्त्यांवर मोकाट फिरत आहेत. या हल्ल्याला आज १० वर्ष उलटली असून आतातरी पाकिस्तानने आपले दुट्टप्पी भूमिका बाजूला फेकून दोषींना शिक्षा करावी.” असे वक्तव्य भारतीय परराष्ट्र विभागाने आज केले आहे.

-Ads-

भारतीय परराष्ट्र विभागाने यावेळी अमेरिकेद्वारे २६/११ हल्ल्यांबाबत पाकिस्तानवर केलेल्या टीकेबाबत समाधान व्यक्त केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)