मुंबईच्या धावपट्टीवर विमान घसरले

file photo

नवी दिल्ली – जयपुरहून मुंबईला येणारे स्पाईस जेटचे एक विमान विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरल्याचाप्रकार काल घडला. मुंबईतील तुफानी पावसामुळे हा प्रकार घडला असे सांगण्यात येते. तथापी त्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर हे विमान उतरले पण ते धावपट्टी सोडून पुढे गेल्याने हा प्रकार घडला. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

या प्रकारामुळे विमान तळाची मुख्य धावपट्टी विमान प्रवासासाठी काहीं काळ बंद ठेवण्यात आली आहे. पर्यायी धावपट्टीवरून ही विमान वाहतूक सुरू ठेवावी लागली आहे. पण ही धावपट्टी तुलनेत छोटी असल्याने मोठी विमाने तिथे उतरवणे अवघड बनले आहे. त्यामुळे अनेक विमाने अहमदाबाद आणि बंगळुरू कडे वळवावी लागली आहेत. जर्मन, कोरिया या देशांवरून मुंबईला येणाऱ्या विमानांना याचा फटका बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)