विमान चालवताना पायलटला लागली झोप आणि विमान भरकटले

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया): विमान चालवत असताना पायलटला झोप लागल्याची आणि त्यामुळे विमान आपल्या मार्गावरून भरकटल्याची धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियात घडली आहे. रस्त्यावरून गाडी चालवत असताना ड्रायव्हरला जराशी डुलकी लागल्याने मोठमोठे जीवघेणे अपघात घडल्याचे आपण नेहमी वाचतो-ऐकतो. मग प्रचंड वेगाने जाणाऱ्या विमानाच्या पायलटला जर झोप लागली तर काय भयानक दुर्घटना होऊ शकली असती याचा विचारही नकोसा वाटतो. सुदैवाने या विमानात पायलट एकटाच होता, आणि पायलटला झोप लागूनही विमान मार्गावरून थोडे भरकटण्याशिवाय काही अघटित घडले नाही. मात्र हे विमान तेवढ्या काळात आपल्या मार्गावरून 46 किमी भरकटले.

मिळालेल्या माहितीनुसार टास्मानियातील डेव्हनपोर्ट शहरापासून बास स्ट्रेटच्या किंग बेटापर्यंत विमान जायचे होते. ट्रॅफिक कंट्रोलचा विमानाच्या पायलटशी संपर्क तुटल्याने पायलटला झोप लागल्याचे आणि विमान भरकटल्यचे लक्षात आले. त्यानंतर मात्र ते विमान किंग बेटावर सुरक्षितपणे उतरवण्यात आल्याची माहिती वॉरटेक्‍स एयर या एयरलाईन्सने दिली आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
5 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)