निर्वासित बाप-लेकीच्या मृतदेहाचा फोटो पाहून हळहळले नेटकरी

नवी दिल्ली – एका नदीकिनाऱ्यावरील निर्वासित वडील आणि त्यांच्या छोट्या मुलीचा मृतदेहाचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून संपूर्ण जगातून हळहळ व्यक्त होत आहे. या फोटोत निर्वासित वडील आणि त्यांच्या टी-शर्टमध्ये लपटलेली छोट्या मुलीचा मृतदेह आहे. या बाप-लेकीच्या मृत्यूला अमेरिकेची नवीन व्हिजा पद्धती जबाबदार आहे.

सेंट्रल अमेरिकाजवळ अल साल्वाडोर नावाचा देश आहे. या देशात राहणारे ऑस्कर एलबेर्तो मारटिनेज़ रैमिरेज़ आणि त्यांची मुलगी वलेरियाचा फोटो मेक्सिकन वृत्तपत्राने छापला आहे. स्थानिक वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, रैमिरेज़ गेली अनेक दिवस अमेरिकेत शरण मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. परंतु, प्रयत्नांना यश मिळत नव्हते. यामुळे ते तणावात होते. रविवारी त्यांनी अमेरिकन-मेक्सिकन सीमारेषेवरील रियो ग्रांड नदी पार करीत होते. त्यावेळी रैमिरेज़ नदीकाठी बसून आपल्या पत्नीची वाट पाहत होते. मात्र त्याचवेळी त्यांची मुलगी वलेरिया पाण्यात पडली आणि तिला वाचविण्यासाठी रैमिरेज़ यांनी नदीत उडी मारली. मुलीला वाचवण्यासाठी रैमिरेज़ नदीत पुढे-पुढे जात होते. काही वेळानी त्यांनी मुलीचा हात पकडला. परंतु, रैमिरेज़ अशा ठिकाणी होते जिथून ते बाहेर पडू शकत नव्हते. आणि त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, मागील वर्षी जवळपास २८३ निर्वासितांचा मृत्यू झाला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here