तिहेरी तलाक अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली 

नवी दिल्ली – तिहेरी तलाक वर बंदी घालणारा जो अध्यादेश केंद्र सरकारने जारी केला आहे त्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. केंद्रीय अध्यादेशात तिहेरी तलाक हा शिक्षापात्र गुन्हा ठरवण्यात आला आहे. त्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी आली होती. पण न्यायालयाने ती फेटाळून लावली.

यामुळे तोंडी तलाक हा शब्द तीन वेळा उच्चारून विवाहीत महिलेला घटस्फोट देणारी मुस्लिम समाजातील प्रथा कायद्याने प्रतिबंधीत करण्यात आली आहे. महिलांच्या समानअधिकाराच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला असून तो अध्यादेशाद्वारे अंमलात आणण्यात आला आहे. त्या विधेयकाला अद्याप संसदेची पुर्ण मंजुरी मिळणे बाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)