अंतरीम अर्थसंकल्पाच्या विरोधातील याचिका फेटाळली

नवी दिल्ली – केंद्र सरकारतर्फे 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेला अंतरीम अर्थसंकल्प रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारी एक याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. अंतरीम अर्थसंकल्पाला घटनेत काही आधार नाही या युक्तिवादानुसार ही याचिका दाखल करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयातील वकिल मनोहर लाल शर्मा यांनी ही याचिका सादर केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की एक तर सरकारने पुर्ण अर्थसंकल्प सादर करावा किंवा तसे शक्‍य झाले नाही तर लेखानुदान मागण्या सादर कराव्यात अशी घटनेत तरतूद आहे. पण सरकारने अंतरीम स्वरूपात थेट अर्थसंकल्पच सादर केला आहे त्याला घटनेनुसार कोणतीही वैधता नाही असे त्यांचे म्हणणे होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पीयुष गोयल यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांना काही सवलती देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)