– शेखर कानेटकर
गेल्या 2014 च्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत देशात आजवरच्या मतदानाचा उच्चांक झाला होता. मोदी लाटेत तब्बल 66.38 टक्के मतदान झाले पण पुण्यात मात्र हा उच्चांक झाला नाही. पुणे मतदारसंघात 54.24 टक्के मतदानाचीच नोंद झाली.
पुण्यात मतदानाचा उच्चांक झाला तो 1984 च्या निवडणुकीत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर लगेचच झालेल्या निवडणुकीत सहानुभूतीची लाट आली आणि पुण्यात सर्वोच्च 66.28 टक्के मतदान झाले. त्यानंतर पुण्यात एवढे मतदान झालेले दिसले नाही. 1989 मध्ये मतदानाचा आकडा 64.21 टक्क्यांवर आला आणि नंतर तो 60 टक्क्याच्या खालीच राहिला.
आणीबाणी उठल्यावर 1977 मध्ये जी निवडणूक झाली तीमध्ये पुण्याचे मतदान 62.98 टक्के होते. आजपर्यंत पुण्यातील मतदानाचा नीचांक 2009 मध्ये झाला. त्यावर्षी अवघ्या 40.66 टक्के पुणेकरांनी मतदान केले.
1977 पासून गेल्या अकरा लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात झालेले मतदान दृष्टिक्षेपात असे-
1977 (62.98 टक्के), 1980 (57.87 टक्के) 1984 (66.38 टक्के), 1989 (64.21 टक्के), 1991 (48.17 टक्के), 1966 (57 टक्के), 1998 (59.6 टक्के), 1999 (52.22 टक्के), 2004 (47.81 टक्के), 2009 (40.66 टक्के), 2014 (54.24 टक्के).