रेंटल यिल्डची टक्केवारी वाढली (भाग-१)

देशातील बहुतांश शहरात रिअल इस्टेट बाजारात दीर्घकाळापासून मंदीचे सावट आहे. प्रत्येक ठिकाणी मालमत्तेच्या किमती अनेक वर्षांपासून स्थिर राहिल्या आहेत. अर्थात अलीकडेच आलेल्या एका अहवालानुसार घराच्या किमतीच्या तुलनेत भाड्यापासून मिळणारे उत्पन्न म्हणजे रेंटल यिल्ड वाढू लागले आहे. यानुसार देशातील 12 मोठ्या शहरांपैकी दहा शहरात वार्षिक रेंटल यिल्ड तीन टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वाढल्याची नोंद झाली आहे. त्यात दिल्ली, नोईडा, गाझियाबाद, गुडगावचा समावेश आहे. वर्षभरात मालमत्तेपासून मालकाला मिळालेले एकूण भाडे हे मालमत्तेच्या मूल्याच्या किती टक्के आहे, त्यास रेंटल यिल्ड असे म्हटले जाते. (वर्षभराचे भाडे/मालमत्तेची किंमत गुणिले 100 ) अशा रितीने ग्रॉस रेंटल यिल्ड काढले जाते.

उदा. वर्षभराचे भाडे 1 लाख 20 हजार असेल आणि मालमत्तेची किंमत 20 लाख असेल तर त्याचा ग्रॉस रेंटल यिल्ड 6 टक्के असेल. अर्थात दिल्ली-एनसीआरमध्ये रेंटलची वाढ जवळपास स्थिरच आहे. मात्र नोईडा एक्‍स्प्रेस वे, सोहना रोड, गोल्फ कोर्स रोड सारख्या भागात भाड्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्धा टक्का वाढ राहिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेंटल यिल्डची टक्केवारी वाढली (भाग-२)

एका अहवालानुसार देशातील मालमत्तेच्या कॅपिटल व्हॅल्यूमध्ये वसुलीच्या तुलनेत रेंटल ग्रोथ अधिक दिसून आली आहे. अर्थात ही ग्रोथ 0.1 ते 0.7 टक्‍क्‍यांपर्यत राहिली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या सेक्‍टरमध्ये असलेली मंदी पाहता ही वाढ उत्साहजनक मानली जात आहे. जुलै महिन्यात या आधारावर केलेल्या अभ्यासात अहमदाबाद, चेन्नई, बंगळूरमध्ये रेंटल यिल्ड चार टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नोंदली गेलेली आहे. फरिदाबाद येथे हीच वाढ 0.7 टक्‍क्‍याच्या घसरणीबरोबर 2.7 टक्के आहे. दिल्ली, नोइडा, गुडगाव आणि गाझियाबाद येथे तीन ते 3.4 टक्के भाड्याचे प्रमाण राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)