सिनेट सदस्यांच्या बैठकिचा मार्ग मोकळा 

विद्यापीठ सिनेटला आचार संहिता लागू होत नाही

मुंबई – विद्यापीठांच्या सिनेट बैठका आणि निवडणूक आचारसंहिता याचा काहीही संबंध नाही. आचार संहितेची ढाल पुढे करून विद्यापीठाच्या स्वायत्तेवर गदा आणण्याचा अधिकार राज्याच्या मुख्य संचिवांना नाही, असा निर्वाळा उच्च्च न्यायालयाने आज दिला. यामुळे वार्षीक बजेट ठरविण्यासाठी विद्यापीठ सदस्यांच्या बैठकिचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या मुख्य संचिवांनी आचर संहिता सुरू झाल्याने विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची विद्यापीठ अर्थसंकल्पासाठी आयोजीत करण्यात आलेल्या बैठका घेण्यात येऊ नये, अशा आशयाचे परीपत्रक राज्याच्या मुख्य सचिवांनी जारी केले होते. या परिपत्रकाला आक्षेप घेत मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य ऍड. निल हेळेकर, पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य बागेश्री मंठाळकर आणि एसएनडीटी विद्यापिठाच्या वतीने ऍड. अंजली हेळेकर यांनी याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम. एस. संकलेचा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने आचार संहिता विद्यापीठ सिनेटला लागू होत नाही. तसेच अशा प्रकारे स्वायत असलेल्या विद्यापीठांना परिपत्रक काढून बैठका घेण्यास मनाई करणार आदेश काढण्याचा अधिकार राज्याच्या मुख्य सचिवांना नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)