दोन मतदारसंघांमधून लढण्याचा निर्णय पक्ष घेईल – राहुल गांधी

नवी दिल्ली: अमेठीसह अन्य मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय कॉंग्रेस पक्षच घेईल, असे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. प्रियांका गांधी वढेरा यांनी अमेठीमधून निवडणूक लढवावी, असा कॉंग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, त्याबाबत पक्षाकडून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे राहुल गांधी म्हणाले.

वाराणसीच्या दौऱ्यावर असताना प्रियांका गांधी यांनी वाराणसीमधून निवडणूक लढवण्यासंदर्भात चाचपणी केली होती. त्यामुळे प्रियांका गांधी वढेरा या लोकसभेची निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे बोलले जाऊ लागले. त्यांनी अमेठीमधून निवडणूक लढवावी असा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह वाढू लागला आहे. मात्र निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय प्रियांका यांनाच घ्यायचा आहे, असे राहुल गांधी म्हणाले. दुसरीकडे राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे निश्‍चित केले असल्याचेही समजते आहे.

“अमेठी ही माझी कर्मभूमी आहे. यापूढेही अमेठी कर्मभूमीच राहिल. पण दुसरीकडून निवडणूक लढवण्याचा पर्याय खुला आहे.” असे राहुल गांधी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)