भारतात घुसून हेरगिरी करणारे पाकिस्तानी ‘ड्रोन’ सैन्याने उडवले

गुजरात : पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर पाकिस्तानपुरस्कृत जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. दरम्यान आज पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रतिउत्तर देत भारतीय वायुसेनेतर्फे पाकव्याप्त काश्मिरात हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या ३००हुन अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे वृत्त आहे.

पुलवामा हल्ल्याला भारतातर्फे चोख प्रतिउत्तर दिले जाण्याची शक्यता लक्षात घेता पाकिस्तान देखील भारतीय सेनेच्या हालचाली टिपण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर करत हेरगिरी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाकिस्तानचे एक ड्रोन आज सकाळी गुजरात येथील पाकिस्तान सीमेनजीक असलेल्या कच्छ येथे भारतीय भागामध्ये घुसून हेरगिरी करत असल्याचे लक्षात आल्यानंतर भारतीय जवानांनी इस्रायली स्पायडर हवाई संरक्षण मिसाइल प्रणालीद्वारे नष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ani_digital/status/1100351862019186693

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)