पानाच्या पिचकारीचे डाग सहज होणार “स्वच्छ”

जागतिक संशोधन स्पर्धेत रूईया महाविद्यालयाच्या विद्यार्थींनीना सुवर्ण पदक 

मुंबई –
रस्ते, रेल्वे, बस स्थानके, इमारती-जीन्यातील कोपरे, ऐतिहासिक स्थळे, स्मारके.. आदि ठिकाणी पानाच्या पिचकाऱ्या मारून त्यांचे सौंदर्य बिघडवल्याचे चित्र जागोजागी दिसते. मात्र, पानाचे लाल रंगाचे डाग काही केल्या जात नाही. परंतु हे डाग धुणे आता सहज शक्‍य होणार आहे. मुंबईतील रूईया कॉलेजच्या विद्यार्थींनीना हा तोडगा मिळाला आहे. या विद्यार्थींनीनी केलेल्या संशोधनाला अमेरिकेच्या मॅसॅच्युसेटस्‌ इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एमआयटी) चे सुवर्ण पदकही मिळाले आहे.

रूईयाच्या या महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पात सहभागींमध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या ऐश्वर्या राजूरकर, अंजली वैद्य, कोमल परब, निष्ठा पांगे, मैथिली सावंत, मिताली पाटील, सानिका आंबरे आणि श्रृतिका सावंत यांचा समावेश आहे. रुईयाच्या या आठ विद्यार्थिनींच्या चमुला डॉ. अनुश्री लोकुर, डॉ. मयुरी रेगे, सचिन राजगोपालन आणि मुग्धा कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

पान खाऊन थुंकल्यामुळे आढळणाऱ्या पानाचे डाग स्वच्छ करण्याची समस्या मोठी आहे. हे डाग काढण्याचा सोपा आणि पर्यावरणपूरक मार्ग या प्रकल्पात समाविष्ट आहे. पान खाऊन कुठेही थुंकण्यामुळे केवळ आरोग्याला धोका उत्पन्न होत नाही. तर त्यामुळे ऐतिहासिक स्थळे, स्मारके व सार्वजनिक वास्तूंचे सौंदर्यही नष्ट होते. तसेच रेल्वे डब्यांमधील हे डाग नष्ट करण्यासाठी दरमहा कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. तरीही डाग पूर्णपणे काढले जात नाहीत.

या समस्येवर जैविक संश्‍लेषणच्या आधारे पर्यावरणपूरक उपाय शोधण्याची संकल्पना डॉ. रेगे यांनी मांडली. पानाचे डाग प्रभावीपणे दूर करण्यासाठी पर्यावरणपूरक उपाय शोधण्यात येत आहे. शिवाय हा उपाय स्वस्त असावा, असाही प्रयत्न यात करण्यात आला आहे. त्यानुसार पानाच्या डागाचा लाल रंग सुरक्षित रंगहीन उत्पादनात परिवर्तित करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा (मायक्रोब्स) आणि विकर (एन्झायम्सचा) या घटकांचा वापर या प्रकल्पात अंतर्भूत केला आहे. पान विक्रेते, स्थानकांचे व्यवस्थापक, शासकीय अधिकारी, सफाई कामगार आणि सफाईचे काम करणाऱ्या संस्था यांच्याशी संवाद साधून त्यांच्या सूचनांचाही या घटकांच्या निर्मितीत अवलंब केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)