पेशावरमध्ये पगडीधारी शिखांना हेल्मेट न वापरण्याची सवलत

पेशावर – पेशावरमध्ये पगडीधारी शिखांना हेल्मेट न वापरण्याची सवलत देण्यात आली आहे. पाकिस्तानातही आता दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले हे. खैबर पख्तुनख्वाह राज्यात शीख समुदायाच्या व्यक्‍तींना दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट न वापरण्याची सवलत देण्यात आली आहे. मात्र केवळ पगडीचा वापरव्‌ करणारांनाच ही सवलत लागू होणार आहे. खैबर पख्तुनख्वाभागात सुमारे 60,000 शीख राहतात आणि त्यापैकी सुमारे 15,000 पेशावरमध्ये राहतात.

शीख समुदायापैकी एकाने पख्तुनख्वाह असेंब्लीमध्ये या मुद्‌द्‌याला वाचा फोडली होती. त्यानंतर पेशावर पोलीसांनी ही सवलत जाहीर केली. पेशावरचे पोलीस अधीक्षक काशिफ जुल्फिकार यांनी या बाबतीत्ग शीख समुदायाला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्‍वसन दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लाहोरमध्ये सप्टॅंबर महिन्यात पोलीसांनी 59,066 दुचाकी स्वारांवर हेल्मेट न वापरण्यासाठी कारवाई केली आहे. हेल्मेट सक्‍तीनंतर पाकिस्तानात हेल्मेटच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. 400-500 रुपयांना मिळणाऱ्या हेल्मेटची किंमत आता 1,000 ते 1,500/- पर्यंत वाढली आह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)