बंगालमध्ये रंगणार रथयात्रा विरूद्ध पदयात्रा संघर्ष 

अमित शहांच्या रथयात्रे विरोधात कॉंग्रेस, मार्क्‍सवादी काढणार पदयात्रा 

कोलकाता  – भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पश्‍चिम बंगाल मध्ये पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रथयाचा काढण्याचे नियोजन केले आहे. त्यांच्या या प्रचाराला विरोध करण्यासाठी कॉंग्रेस आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने पदयात्राकाढून संपर्क मोहीम राबवण्याचे ठरवले आहे. तथापि सत्ताधारी तृणमुल कॉंग्रेसने मात्र भाजप अध्यक्षांच्या या रथयात्रेला फार राजकीय महत्व देण्याचे टाळले आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या या यात्रेविरोधात कोणत्याही मोहिमेचे आयोजन केलेले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पश्‍चिम बंगाल मध्ये अलिकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेस आणि अन्य डाव्या पक्षांना मागे सारून तृणमुल कॉंग्रेस नंतर दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवल्या आहेत. हाच आधार आणखी बळकट करण्यासाठी भाजपने आता राज्यात रथयात्रांद्वारे संपर्क मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला काऊंटर करण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसने जनसंपर्क अभियान हाती घेतले असून पुढील महिन्याच्या अखेरीला त्यांचे हे अभियान सुरू होईल. तर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसानसभेने सिंगुर आणि हुगळी जिल्ह्यात तीन पदयात्रांचे आयोजन करीत आपल्याही प्रचाराचे झेंडे पुढे करायचे ठरवले आहे.

प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सोमेन मित्रा म्हणाले की आम्ही आमच्या जनसंपर्क अभियानात मोदी सरकारच्या भ्रष्ट आणि फसवेगिरीच्या राजकारणाच्या विरोधात प्रामुख्याने जनजागृती करणार आहोत. अन्य कोणाच्या प्रचार मोहिमांना विरोध म्हणून नव्हे तर पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील मोहीमेचा भाग म्हणून आम्ही या राज्यात हे अभियान राबवणार आहोत असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)