पॅसेफिकच्या बेटांचा जपान-रशिया वाद पुढील पिढीपर्यंत राहू नये : शिंझो ऍबे

मॉस्को (रशिया) :पॅसेफिक महासागरातील चार कुरील बेटांबाबत जपान-रशिया या दोन देशांतील वाद हा पुढील पिढीपर्यंत राहू नये, असे जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांनी म्हटले आहे. ब्लादिमीर पुतीन यांचीही तशीच इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रशियाच्या दौऱ्यावर आलेल्या शिंझो ऍबे यांनी मंगळवारी ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. शिंझो-पुतीन यांची ही 2013 नंतर 25 वी भेट आहे. पॅसेफिक महासागरातील जपानच्या चार बेटांचा – कुरील बेटांचा दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाने कब्जा घेतलेला आहे. मात्र या बेटांवर रशियाचा अधिकार असल्याचे जपानला मान्य नाही, त्यामुळे दुसरे महायुद्ध संपून इतकी वर्षॅ झाली तरी जपान आणि रशियात शांतिसंधी होऊ शकलेली नाही. कुरियन बेटांचा वाद जपान आणि रशियाच्या पुढील पिढीपर्यंत जाऊ नये असे आपल्याप्रमाणे ब्लादिमीर पुतीन यांचेही मत असल्याचे शिंझो यांनी म्ह्टले आहे. रशियाच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्यांनी हे विधान केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या महायुद्धाचा निकाल लक्षात घेऊन जपानने ही बेटे रशियाची असल्याचे मान्य करावे असे असे रशियाचे म्हणणे आहे. रशियातील 90 टक्के लोकांचे मत ही बेटे जपानला परत देऊ नयेत असे आहे.उलटपक्षी या बेटांवरील लोकांनी आपले नागरिकत्व बदलण्यास सज्ज राहावे असे शिंझो ऍबे यांनी रशिया दौऱ्यावर येण्यापूर्वीच म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)