त्या’ महिला अधिकार्‍याच्या चौकशीचे आदेश

महिलेला डांबुन ठेवणे आले अंगलट; जिल्हा नियंत्रकांनी मागवला अहवाल

सातारा – बनावट ओळखपत्र बाळगल्याचा संशय व्यक्त करुन एका महिलेला चौकशीच्या नावाखाली सुमारे चार तास डांबुन ठेवल्याचा संतापजनक प्रकार केल्याचे प्रकरण त्या महिला अधिकाऱ्याच्या चांगलेच अंगलट आले आहे. एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आगारव्यवस्थापकांना कारवाईचा अहवाल मागवल आहे. त्या महिला अधिकाऱ्यावर एसटीच्या नियमानुसार शिस्तभंगाची कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा नियंत्रक सागर पळसुले यांनी दिले आहेत.

शनिवारी दुपारी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्‍यातील एक महिला साताऱ्यात शिक्षणासाठी असलेल्या तिच्या मुलाला भेटण्यासाठी आली होती. दरम्यान ती महिला ज्या बसमध्ये बसली होती. त्या बसच्या वाहकाला तिच्याकडील सवलतीचे ओळखपत्र बनावट असल्याचा संशय आला. त्याने याची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर त्या महिलेला सातारा बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकांच्या खोलीत चार तास बसवण्यात आले होते.

खरे तर हे तिकीट तपासणीसांचे काम असतानाही, एसटी महामंडळाच्या सहाय्यक वाहतूक नियंत्रक भाग्यश्री प्रभुणे यांच्यापुढे त्या महिलेची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्या महिलेला 72 हजार रुपये दंड भरण्याचे फर्मान प्रभुणे यांनी सोडले होते. त्यावेळी त्या महिलेने आपल्याकडे तेवढे पैसे नसल्याचे सांगितले. तरीही दंड भरावाच लागेल असे सांगत प्रभुणे यांनी त्या महिलेला चार तासाहून अधिक काळ खोलीतच बसवून ठेवल होते.

दरम्यान याची माहिती त्या महिलेच्या मुलाला कळाल्यावर त्याने सोलापूर जिल्ह्यात पोलिस अधिकारी असलेल्या आपल्या नातेवाईकाला घडला प्रकार कळवल्यानंतर पोलिस व एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या महिलेची सुटका केली होती. या अन्यायकारक कारवाईला दै.प्रभातने उजेडात आणत प्रकरणाला वाचा फोडली होती. प्रभातच्या वृत्ताची दखल घेत एसटीचे जिल्हा नियंत्रक सागर पळसुले यांनी सातारा आगाराच्या वरिष्ठ व्यवस्थापक स्मिता कुलकर्णी यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. या कारवाईचा अहवालही तात्काळ नियंत्रक कार्यालयाला सादर करायचा असल्याने यापुढे एसटीचा कोणताही कर्मचारी असे कृत्य करताना विचार करेल.

ती अधिकारी त्रासदायकच आहे

सातारा आगारातील प्रभुणे या महिला अधिकाऱ्याची बातमी आज वाचनात आली. काही दिवसापुर्वी मी साताऱ्याहून पुण्याला निघालो होतो. पुण्याला जाणाऱ्या विना वाहकतिकीट बुकींगच्या केबीनमध्ये मागच्या दाराने प्रवेश करून त्या अधिकाऱ्याने आपल्या काही नातेवाईकांना तिकीट काढुन दिली होती. तेव्हा बराच वेळ रांगेत उभा असल्याने मी त्यांना जाब विचारला असता त्यांनी अतिशय उर्मटपणे उत्तरे दिली होती. याची तक्रार मी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडेही केली आहे.

प्रदीप माळी, दररोज पुण्याला जाणारा प्रवासी

सामाजिक संघटना आक्रमक

एका महिलेला अशी वागणुक दिली गेल्याने, जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रभातने एका महिलेला न्यान मिळावा म्हणून केलेल्या वार्ताकंनाचे कौतुकही त्यांनी केले. येणाऱ्या काळात जिल्हा वाहतूक नियंत्रकांनी कडक कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)