देशाबाहेर जाणाऱ्या करोडपती भारतीयांची संख्या वाढली

नवी दिल्ली – जगातील झपाट्याने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख आहे. आतापर्यंत शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्या भारतीयांची संख्या जास्त होती. व्यापारासाठी आणि गुंतवणुकीसाठी अनेक देश भारताला प्राधान्य देत आहेत. आर्थिक, औद्यागिक आणि इतर क्षेत्रातही भारताचा वेगाने विकास होत आहे. देशातील या ब्रेन ड्रेनबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आता देशातील श्रीमंत व्यक्तीही देशाबाहेर जात आहेत. या गोष्टी देशासाठी अभिमानाच्या असल्या तरी देशातील करोडपती आणि अतिश्रीमंत व्यक्ती देशाबाहेर जाण्याची संख्याही वाढली आहे. ही चिंतेची बाब असल्याचे मानण्यात येत आहे.

परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच दरवर्षी परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. देशातील सक्षम, कर्तृत्ववान आणि कौशल्य असलेले विद्यार्थी परदेशात गेल्याने देशाचे मोठे नुकसान होते.
तसेच नोकरीसाठी बाहेर जाणाऱ्यांमुळे देशाला गरज असलेले कुशल मनुष्यबळ इतर देशांकडे जाते. देशातील हे ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यासाठी अशा तरुणांना देशातच त्यांच्या क्षेत्रातील संधी निर्माण करुन देण्याची गरज आहे.

अफरासिया बॅंक आणि खर्म न्यू वर्ल्ड वेल्थकडून करण्यात आलेल्या ग्लोबल वेल्थ माइग्रेशन रिव्ह्यू 2019 या अहवालात गेल्या वर्षभरात श्रीमंत भारतीय देशाबाहेर जाण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. करोडपती आणि देशातील अतिश्रीमंत व्यक्तीपैकी 5000 जणांनी देश सोडल्याचे अहवालात म्हटले आहे. 2017 पर्यंत देश सोडून ब्रिटनमध्ये स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाण जास्त होते.

मात्र, सध्या ब्रक्‍झिटमुळे तेथे अनिश्‍चततेचे वातावरण असल्याने तेथे जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. चीन आणि रशियातील नागरिकही मोठ्या प्रमाणात देश सोडत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. देशाबाहेर पडून अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असतात.

भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने विकसीत होत असली तरी देशातील असमानता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील अर्धी संपत्ती करोडपती किंवा अतिश्रीमंत लोकांच्या हाताताच केंद्रीत झाली आहे. त्यामुळे सुखासीन जीवनशैलीसाठी अतिश्रीमंत देशाबाहेर पडत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)