फिलिपाईन्समधील वादळातील मृतांची संख्या 68 वर पोहचली

मनिला (फिलिपाईन्स): क्रिसमसनंतर फिलिपाईन्समध्ये धडकलेल्या वादळातील मृतांची संख्या 68 वर पोहचली असून ती आणखी वाढण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मनिलाच्या दक्षिणपूर्वेतील बिकोल भागात 57 लोक मरण पावले आहेत. आणि समर बेटावरील 11 जण मरण पावले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भूस्खलनामुळे आणि पाण्यात बुडून मोठ्‌या प्रमाणावर प्राणहानी झाली आहे. बऱ्याच भागाची अद्याप पाहणी करायची आहे, त्यामुळे मृतांचा आकडा बराच वाढू शकेल असे नागरी संरक्षण संचालक क्‍लॉडियो युकॉट यांने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुटीत सण साजरा करण्याचा भरात लोक बेसावध राहिल्याने आणि ट्रॉपिकल वादळाची पूर्वचूचना नसल्याने प्राणहानी मोठ्‌या प्रमाणावर झाली आहे. या वादळामुळे सुमार 40,000 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, असे नागरी संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

फिलिपाईन्सला दरवर्षी सरासरी 20 वादळे तडाखा देतात. त्यात शेकडो लोक मरण पावतात आणि लाखो बेघर होतात.
सन 2013 मधील हैयान नावाच्या भयानक वादळाने 7360 लोक मरण पावले होते, वा बेपत्ता झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)