इंडोनेशियातील नैसर्गिक आपत्तीच्या घटनेतील मृतांची संख्या 59 वर

मकास्सार: इंडोनेशियाच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून त्यामुळे आलेल्या पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनेत आत्तापर्यंत 59 जण मरण पावले आहेत. पुराचा तडाखा हजारो लोकांना बसला असून या विस्थापितांनी आपली घरे सोडून अन्यत्र आश्रय घेतला आहे. पुराच्या आपत्तीमुळे बेपत्ता झालेल्यांची संख्या मोठी आहे.

सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की विविध भागातील पुराचे पाणी ओसरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तथापि या पुरामुळे झालेली हानी खूप मोठी आहे. अनेक शाळा, सरकारी इमारती आणि रूग्णालयांच्या इमारतींचे या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. वीज आणि संपर्क यंत्रणाही मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली असून ही स्थिती ठीक करण्यास बराच कालावधी लागू शकतो. गेल्या ऑक्‍टोबर महिन्यातच इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाला पुराचा मोठा तडाखा बसला होता. त्यातून ही स्थिती सुधारते नाही तोच इंडोनेशियाच्या मुख्य भुमीलाही या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)