भोपाळ – साध्वी प्रज्ञासिंह यांना शहीद हेंमत करकरे यांच्यासंबंधात वादग्रस्त विधान केल्याच्या कारणावरून निवडणूक आयोगाने नोटीस जारी केली आहे.येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी शहीद करकरे यांच्या विषयी केलेले विधान आमच्या वाचनात आल्यानंतर आम्ही स्वताहून त्यांच्यावर नोटीस जारी केली आहे. त्यांना येत्या 24 तासांत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. तेथील सहायक अधिकाऱ्यांकडून या वक्तव्यांच्या संबंधातही अहवाल मागवण्यात आला. गुरूवारी रात्री साध्वींनी भोपाळ मध्ये ही वादग्रस्त विधाने केली होती.
आपल्या शापामुळेच दोन महिन्याच्या आत हेमंत करकरे यांची हत्या झाली असे त्या म्हणाल्या होत्या. पण वाद निर्माण होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यावर दिलगिरीही व्यक्त केली होती. पण तेवढ्या दिलगीरीने निवडणूक आयोगाचे समाधान झालेले दिसले नाही. असिस्टंट रिटर्नींग ऑफीसरकडून आलेला अहवाल निवडणूक आयोगाला पाठवला जाईल असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.