साताऱ्यात दुसऱ्या दिवशी 17 अर्जांची विक्री

सातारा – साताऱ्यात दुसऱ्या दिवशी 8 उमेदवारांसाठी 17 अर्जांची विक्री झाली आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासाठी ऍड.प्रशांत खामकर यांनी 4 अर्ज घेतले आहेत. आ. शशिकांत शिंदे यांच्यासाठी राजेंद्र गुरव यांनी 2 अर्ज घेतले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी सागर भिसे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे यांच्यासाठी प्रशांत ऐवळे यांनी 4 उमेदवारी अर्ज घेतले आहेत.

विठ्ठल बलशेटवार, रा.सातारा यांनी 2, विजयानंद शंकरराव शिंदे, रा.करंजे सातारा यांनी 1, सदाशिव साहेबराव बागल रा.गोवे ता.सातारा व किशोर हणुमंतराव धुमाळ रा.गोडोली ता.सातारा यांनी प्रत्येकी 1 अर्ज घेतले आहेत. दरम्यान, शनिवार दि.30 रोजी महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील अर्ज दाखल करणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 4 एप्रिलपर्यंत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)