मोदींच्या विजयाप्रित्यर्थ अब्जावधींच्या नोटा उधळल्याचे वृत्त खोटे

न्यूयॉर्क – भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयामुळे आनंदीत झालेल्या एका भारतीय श्रींमत नागरीकाने येथील मॅनहटन भागात तब्बल शंभर अब्ज डॉलर्सच्या नोटा रस्त्यावर उधळल्याचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. पण हा दावा सपशेल खोटा असल्याची माहिती संबंधीत सूत्रांकडून देण्यात आली आहे.

जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो भारतीय नागरीकाचा नाही. आणि तो मोदीचा समर्थकही नाही. मोदींच्या विजयाच्या एक आठवडा आधीच या माणसाने मॅनहटन येथे पाच अब्ज डॉलर्सच्या नोटा उधळल्या होत्या व त्या इसमाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकला होता. हाच व्हिडीओ मोदी समर्थकाच्या नावावर खपवण्यात आला असे उघड झाले आहे. पाच अब्ज डॉलर्सच्या या नोटा उधळणाऱ्या व्यक्तीचे नाव जो कुश असे आहे. त्याचा भारतातील घटनांशी अथवा निवडणुकांशी काहींही संबध नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हा व्हीडीओ मोदी समर्थक या नावावर व्हॉटसऍप आणि अन्य सोशल मिडीयावर खपवण्यात आला. तो अनेकांनी फॉवर्ड व शेअरही केला. त्यामुळे या व्यक्तीविषयी मोठेच कुतुहल निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)