घटस्फोटाच्या बातम्या म्हणजे अफवा- इमरान खान

आमिर खानचा भाचा इमरन खान सध्या आपल्या वैवाहिक आयुष्याशी संबंधित बातम्यांमुळे विशेष चर्चेत आहे. इमरान खान आणि त्याची पत्नी अवंतिका यांच्यात सध्या बेबनाव सुरू असून ते दोघेही घटस्फोट घेण्याची शक्‍यता आहे, असे वृत्त काही दिवसांपूर्वी पसरले होते. याच प्रश्‍नावरून एका इव्हेन्टच्या प्रसंगी त्याला छेडले गेले. तेंव्हा इमरान तर उखडलाच.

“या इव्हेन्टच्या प्रसंगी असा प्रश्‍न कसा काय विचारला जाऊ शकतो ?’ असा उलटा सवालच त्याने केला. पण हे उत्तर देताना तो अजिबात रागावलेला नव्हता. उलट त्याच्या चेहऱ्यावर मंदस्मित झळकत होते. दोघांमधील बेबनाव मिटवण्यासाठी दोघांचेही कुटुंबीय प्रयत्नशील आहेत. मात्र अवंतिकाने आपल्या नावातून इमरानचे आडनाव “खान’ हटवले आहे. तेंव्हापासूनच दोघांमध्ये काही तरी टेन्शन निर्माण झाले असल्याचे जगासमोर आले आहे.

इमरान आणि अवंतिका मलिक 2011 साली विवाहबद्ध झाले होते. त्याच्याही आगोदरपासून दोघे बराच काळ डेट करत होते. “जाने तू या जाने ना’, “डेली बेली’, “मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि “मटरू की बिजली का मंडोला’सारख्या सिनेमांमध्ये इमरानने काम केले आहे. सर्वात शेवटी तो कंगणा रणावतच्या “कट्टी बट्टी’मध्ये दिसला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)