आरईसी कंपनीकडून केंद्र सरकारला लाभांश सादर

नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आरईसी लिमिटेड या वीज उत्पादन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपनीने सन 2018-19 मध्ये वीज मंत्रालयाकडे 1143 कोटी रुपयांचा अंतिम लाभांश सादर केला आहे.

कंपनीने हा लाभांश 20 मार्च रोजी वीजमंत्रालयाकडे दिल्याची माहिती कंपनीचे चेअरमन अजित कुमार यांनी दिली आहे.
सरकारकडे हा लाभांश सादर करताना 11 रुपये प्रति शेअर्सचा दर आकारला जाणार असून याच दराने हा अंतिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

यावर कंपनीने चालू वित्त वर्षाच्या अगोदर नऊ महिने कंपनीने 96,357 कोटी रुपयांच्या नवीन परियोजना राबविण्यासाठी मंजुरी दिली आहे. नवीन परियोजनाच्या आधारे अन्य ठिकाणी विविध प्रकारे वीज वितरण करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.

गेल्या पाच वर्षात भारतातील वीज निर्मिती आणि वितरण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे विजेची तूट कमी झाली आहे. या कारणांमुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या महसूल आणि नफ्यातही वाढ होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या कंपनीने लाभांश दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)