एअर स्ट्राईक वर नवा खुलासा, जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांना नुकसान झाले नसल्याचा दावा

नवी दिल्ली – २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय वायुसेनेने बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी केंद्रावर हवाई हल्ला करत कारवाई केली होती. या हवाई हल्ल्यानंतर दहशतवादी ठिकाणांचे मोठे नुकसान केले असल्याचे भारतीय वायुसेनेने सांगितले होते. परंतू या कारवाई नंतर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी ठिकाणांना कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा यूरोपीय स्पेस एजन्सी केला आहे.

ऑस्ट्रेलियन स्टॅटेजीक पॉलिसी इन्स्टिटयूट ने यूरोपीय स्पेस इमेजिंग च्या आधारे भारतीय वायू सेनेने केलेल्या हवाई हल्ल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामध्ये यूरोपीय स्पेस एजन्सीने हवाई हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी काढलेली काही हाई रिजोल्यूशन फोटो प्रसिद्ध करण्यात आली. या फोटोंवरून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी ठिकाणांना कोणतेही नुकसान झाले नसल्याचे दिसत आहे. इमारतींच्या वर काही छोटे-मोठे निशाण दिसत असून ते स्पाइस २००० या मिसाइलचे नसल्याचे म्हंटले आहे.

या रिपोर्ट नुसार हाई रिजोल्यूशन फोटो आणि स्थानिक पत्रकारांनी घेतलेल्या फोटोत तुलना केली असून लक्ष्यभेद केलेल्या ठिकाणापासून दहशतवादी ठिकाण ३० मीटर दूर असल्याचे म्हंटले आहे. कारण याठिकाणी जमिनीवर खड्डे पडले असून झाडे देखील पडल्याचे म्हंटले आहे.

यूरोपीय स्पेस एजन्सीच्या मते असा लक्ष्यभेद फक्त कला आणि विज्ञान याच्या समन्वयानेच अचूक निशाणा साधता येत असे म्हंटले आहे. असा निशाणा फक्त उंची आणि अक्षांश यांच्या मोजमापावर घेतला जाऊ शकतो. यामध्ये थोडी जरी चूक झाली तरी स्पाइस २००० मिसाइलचा निशाणा बदलतो. त्यामुळे विमानाने घेतलेला अचूक नेम बदलला असून तो अन्य ठिकाणी लागल्याचे म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)