‘संघ’ कार्याच्या तपासणीचे आदेश दिल्याने नितीशकुमार-भाजपमध्ये नव्या वादाची ठिणगी?

File pic

पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत कार्यकर्ते आणि त्यांच्याशी संबंधीत एकूण 19 संस्था, संघटनांची पोलिसामार्फत माहिती मिळवण्याचा आदेश आपल्या गुप्तचर यंत्रणेला दिला आहे. त्यामुळे भाजप आणि नितीशकुमार यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. ही माहिती गोळा प्रकार अनावश्‍यक आहे असे भाजपने म्हटले आहे.

राज्याच्या गृह विभागाचा कारभार मुख्यमंत्र्यांच्याच हातात असून त्यांनी पोलिसांना संघाचे स्वयंसेवक आणि त्यांच्याशी संबंधीत 19 संघटनांची माहिती संकलीत करून ती थेट मुख्यमंत्र्यांना सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बिहार पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांमार्फत ही माहिती संकलीत केली जात आहे. आणि थेट मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नियंत्रणाखाली हे काम बिहार मध्ये गुप्तपणे सुरू आहे.

पोलिस दलातील स्पेशल ब्रॅंचच्या डेप्युटी सुपरिंटेडेंट दर्जाच्या सर्व अधिकाऱ्यांना ही माहिती आठवड्याच्या आत सादर करण्याचा आदेश नितीशकुमारांनी दिला आहे. भाजपचे विधान परिषदेचे सदस्य संजय मयुख यांनी हा विषय विधान परिषदेत उपस्थित करताना नितीशकुमार सरकारने दिलेल्या या तपासणी आदेशावर तीव्र नापसंती व्यक्त केली. ही माहिती संकलीत करण्याचे काम अनाठायी आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नितीशकुमार यांनी लगेचच ही माहिती संकलीत करण्याचा आदेश दिलेला आहे.

तथापी ही काही गंभीर बाब नाही असे संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. हा माहिती संकलीत करण्याचा नियमीत स्वरूपाचा कामकाजाचा भाग आहे असे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. तथापी या प्रकरणावरून भाजप आणि नितीशकुमार यांच्यात पुन्हा मोठा संघर्ष उभा राहु शकतो. भाजप आणि नितीशकुमार यांच्यात केंद्रीय मंत्रिमंडळातील वाट्याबाबत मतभेद आहेतच. त्यात आता या नवीन वादाची ठिणगी पडली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)