नवे केबल धोरण ग्राहकांसाठी फायदेशीर – ट्राय

नवी दिल्ली – ग्राहकांना पसंतीचे टीव्ही चॅनेल्स निवडण्याचे स्वातंत्र्य देणारे नवे केबल धोरण लागू केल्यामुळे, ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार नसल्याचे टेलिकॉम रेग्युलेटरी ऍथोरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन आर एस शर्मा यांनी आज सांगितले आहे.

ट्रायच्या नवीन नियमानुसार ग्राहकांना जे चॅनेल्स पाहायचे आहेत केवळ त्याचेच पैसे द्यावे लागणार आहेत. ही नवीन नियमावली ग्राहकांसाठी फायदेशीर असल्याचे आर एस शर्मा यांनी सांगितले असून १ एप्रिल पासून ग्राहकांना फक्त निवडलेल्या चॅनेल्सचेच पैसे द्यावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

ट्राय च्या नवीन नियमानुसार ब्रॉडकास्टर्स, डीटीएच ऑपरेटर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर्स यांना प्रत्येक चॅनेल्स साठी वेगळी किंमत ठरविण्यासाठी सांगण्यात आले होते. शर्मा यांनी नव्या धोरणाबद्दल बोलताना सरासरी ९० टक्के लोक हे ५० पेक्षा कमी चॅनेल्स पाहत असल्याची माहिती दिली.

१०० फ्री चॅनेल्स साठी ग्राहकांना फक्त १३० रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच ग्राहकांना वैयक्तिक घेतलेल्या चॅनेल्स साठी वेगळी किंमत मोजावी लागणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)