पोलाद क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाची गरज : बिरेंदर सिंह

मुंबई – मेक इन इंडियाच्या पूर्ततेसाठी पोलाद क्षेत्रात नवतंत्रज्ञान आणि नवीनतम शोधांची गरज आहे. 2014 पासून सरकारने उचललेल्या पावलांमुळे 2018-19 च्या पहिल्या नऊ महिन्यात पोलाद उत्पादनाचा विकास 4.5 टक्‍क्‍यांवर, तर पोलाद वापरात 8.4 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सरकार, पोलाद कंपन्या आणि इतर संबंधितांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे पोलाद क्षेत्रात परिवर्तन शक्‍य झाल्याचे केंद्रीय पोलाद मंत्री चौधरी बिरेंदर सिंग यांनी सांगितले.

वर्ष 2019 विस्ताराचे वर्ष करण्याचे आवाहन बिरेंदर सिंग यांनी उद्योग क्षेत्राला केले. भारत पोलाद 2019 परिषदेत बोतांना ते म्हणाले की विस्ताराचा अर्थ नव्या भागात, नव्या बाजारपेठांमध्ये, नव्या वापर क्षेत्रात आणि नव्या देशांमध्ये पोहोचणे. राष्ट्रीय पोलाद धोरणात निश्चित करण्यात आल्याप्रमाणे 2030-31 पर्यंत 300 दशलक्ष टनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येकाने वेगाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वर्ष 2018 पोलाद क्षेत्राला भक्कम करणारे वर्ष होते. भारतातील पोलाद क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करण्यासाठी देशविदेशातून गुंतवणूकदार पुढे आले, स्वयं पूर्णता आणि मेक इन इंडियाच्या दिशेने ते मोठी झेप घेणारे ठरले, असे पोलाद मंत्र्यांनी सांगितले. 2018 च्या पहिल्या 11 महिन्यात पोलाद उत्पादनात जपानला मागे टाकत भारत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा कच्चा पोलादाचा उत्पादक देश ठरला आहे. 86 टक्के उत्पादने गुणवत्ता नियंत्रणात आली असून, 100 टक्‍क्‍यांकडे वाटचाल सुरु आहे. नवे राष्ट्रीय पोलाद सुरक्षा मंडळ लवकरच स्थापन केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)