खेळाच्या प्रगतीसाठी योगदानाची गरज

बाळा भेगडे ः प्रतीक देशमुख युवा क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित

लोणावळा – सध्या सर्वच क्षेत्रातील गुणवंतांना विविध क्षेत्रात चांगले दिवस आले आहे. खेळ कोणताही असो, खेळात राजकारण न आणता प्रत्येक खेळाडू व खेळाच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे, असे आवाहन कामगार, पर्यावरण मदत व भूकंप पुर्नवसन राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी व्यक्त केले.

मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने सडवली येथे बाळा भेगडे यांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. तसेच राज्यस्थान (कोटा) येथे झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रतिक शंकर देशमुख याने 85 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले होते. तर यापूर्वी झालेल्या शालेय राज्य स्पर्धेत सुवर्ण व राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. यानिमित्त मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने प्रतिक देशमुख यांना “युवा क्रीडारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी ऑलंपिकवीर व मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मारुती आडकर, अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन चंद्रकांत सातकर, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संभाजी राक्षे, सचिव बंडू येवले, उपाध्यक्ष खंडू वाळूंज, मनोज येवले, तानाजी कारके, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ टिळे, भाजपचे तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, युवक अध्यक्ष संदीप काकडे, कालिदास दाभाडे, नथू घारे, सुनील दाभाडे, संतोष देशमुख, नवनाथ फाळक, मारुती देशमुख आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)